सिनेमाच्या शुटींगदरम्यान गुरु रंधावाला दुखापत; रुग्णालयातील शेअर केला फोटो

Guru Randhawa | लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता गुरु रंधावाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी चित्रपटाच्या अॅक्शन सीनच्या शुटींगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
गुरु रंधावानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो रुग्णालयाच्या बेडवर असल्याचं दिसून येते. त्याशिवाय त्याची सर्जरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याच्या डोक्याला बॅन्डेज केल्याचं दिसत आहे. गुरु रंधावा म्हणाला, ‘माझा पहिला स्टंट, माझी पहिली दुखापत पण तरी सुद्धा माझ्यात असलेला उत्साह हा कमी झालेला नाही. ‘शौंकी सरदार’च्या सेटवरची एक आठवण. अॅक्शन सीन्स करणं खूप कठीण आहे पण माझ्या प्रेक्षकांसाठी नक्कीच मेहनत करेन.’ Guru Randhawa |
View this post on Instagram
गुरु रंधावाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान, गुरु रंधावा ‘शौंकी सरदार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. यात गुरु रंधावा दमदार भूमिकेत दिसणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याला दुखापत झाली आहे.
हेही वाचा:
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता उद्या मिळणार; बिहारमध्ये पार पडणार कार्यक्रम





