जरांगेची सागर बंगल्याकडे कुच ! गुणरत्न सदावर्ते म्हणतात,”महाराष्ट्राला अशांत करण्याचं..”

Gunratna Sadavarte On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केले आहे. तुम्हाला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो,’ असे आव्हान जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल. त्यानंतर आता याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र डिस्टब होऊ देऊ नका अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल असं जरांगे म्हणाले आणि त्यांनी अंतरवलीतून थेट फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली. | Gunratna Sadavarte On Manoj Jarange
जरांगे यांच्या या कृतीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शाळेसह महाविद्यालयाच्या परीक्षा सुरु असताना महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालू आहे. न्यायालयाचे निर्देश असताना देखील जरांगे पुन्हा एकदा हम करे सो कायदा याप्रमाणे वागत आहे.असं स्पष्ट मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केल. | Gunratna Sadavarte On Manoj Jarange
अंतरवलीतून निघून मी याच्या त्याच्या घरी जाऊन जीव देतो अशी भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहेत. लोक रस्त्यावर यावेत हा यामागचा त्यांचा हेतू आहे. राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल याचा देखील तपास व्हायला हवा असं सदावर्ते म्हणाले. महाराष्ट्र डिस्टब होता कामा नये अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली. | Gunratna Sadavarte On Manoj Jarange





