#IPL2023 #DCvGT : गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

दिल्ली : आयपीएलच्या 16व्या हंगामातील सातव्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Gujarat Titans have won the toss and elect to bowl first against DelhiCapitals). दुखापतग्रस्त केन विल्यमसनच्या जागी गुजरातने डेव्हिड मिलरचा संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर विजय शंकर यांच्या जागी बी साई सुदर्शनला स्थान मिळाले आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने रोव्हमन पॉवेलला संघातून वगळले आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा एनरिच नॉर्टजे खेळत आहे. बंगालचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेललाही प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे –
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ.
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, रिले रुसो, सर्फराज खान (विकेटकीपर), अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अमन हकीम खान, खलील अहमद, एनरिच नॉर्टजे.
#IPL2023 #DCvGT : गुजरात टायटन्सने Toss जिंकला, कर्णधार पंड्याने घेतला ‘हा’ निर्णय
दरम्यान, दिल्लीला मोसमातील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. गेल्या सामन्यात दिल्लीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.





