T20 World Cup 2024 (Warm-up match) : टीम इंडियाचा बांगलादेशविरूध्द फलंदाजीचा निर्णय..! विराटचा समावेश नाही, ‘अशी’ आहे दोन्ही संघाची Playing 11

T20 World Cup 2024 (Ind vs Ban Warm-up match) : भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने करेल. याआधी आज भारत आणि बांगलादेश यांच्यात T20 विश्वचषक 2024 चा सराव सामना खेळला जात आहे. या सामन्यातून दोन्ही संघ आपले संयोजन शोधण्यासाठी उतरले आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आपल्या तयारीची चाचपणी करण्याची सुवर्णसंधी असेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (TeamIndia win the toss and elect to bat in the warm-up match against Bangladesh) त्यामुळे बांगलादेशचा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरताना दिसणार आहे. विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या एकमेव सराव सामन्यात खेळताना दिसणार नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्माने याला दुजोरा दिला आहे.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia win the toss and elect to bat in the warm-up match against Bangladesh.
Follow the Match ▶️ https://t.co/ivHxoCo2gt#T20WorldCup pic.twitter.com/slTc7Q7QBR
— BCCI (@BCCI) June 1, 2024
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल .
बांगलादेश : लिटन दास, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयॉय, शाकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकर अली (यष्टीरक्षक), महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तन्झीद हसन, तन्झीम हसन शाकिब, तनवीर इस्लाम .
T20 World Cup 2024 : ‘हे’ तिन्ही संघ पहिल्यांदाच खेळणार टी-20 विश्वचषक, करू शकतात मोठा उलटफेर….
सराव सामना कुठे बघायला मिळणार?
टी 20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. त्याच वेळी, या सामन्यांचे फोन किंवा लॅपटॉपवर लाइव्ह-स्ट्रीमिंग हे डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया आणि भारत-बांगलादेश या दोनच सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
दरम्यान, बांगलादेशचा पहिला सराव सामना अमेरिकेविरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. या स्पर्धेपूर्वी बांगलादेशचा अमेरिकेकडून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव झाला होता. मागील आकडेवारी पाहता भारतीय संघाचा बांगलादेशवर वरचष्मा असून आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 13 सामने झाले आहेत. त्यापैकी 12 सामने भारताने जिंकले आहेत.





