IPL 2024 ( #CSKvRCB ) | आरसीबीचा सीएसकेविरूध्द फलंदाजीचा निर्णय…! ‘अशी’ आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11 …

IPL 2024 , CSK vs RCB Live Cricket Score & Toss Update & Playing 11 : आयपीएल 2024 चा 17वा सीझन आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. CSK विक्रमी नवव्यांदा आयपीएलचा सलामीचा सामना खेळणार आहे. त्याचवेळी आरसीबी पाचव्यांदा आयपीएलचा पहिला सामना खेळताना दिसणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss) हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ( Royal Challengers Bengaluru won the toss and elected to bat ) सीएसकेकडे डॅरिल मिचेल, रचिन रवींद्र, महेश तिक्षना आणि मुस्तफिझूर रहमान हे चार परदेशी खेळाडू आहेत तर बेंगळुरूकडे चार कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ हे चार परदेशी खेळाडू आहेत.
🚨 Toss Update 🚨@RCBTweets won the toss and will bat first against @ChennaiIPL 🙌
Live 💻📱 https://t.co/4j6FaLF15Y#TATAIPL | #CSKvRCB pic.twitter.com/jQ9xljX0Px
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
CSK vs RCB : दोन्ही संघांचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, महेश टेकशाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.
CSK आणि RCB यांच्यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अतिशय प्रभावी ठरते. या मैदानावर फिरकीपटू फलंदाजांना खूप त्रास देतात. येथे बहुतेक फक्त कमी स्कोअरिंग सामने पाहिले जातात. खेळपट्टीचे खरे वर्तन सामन्यादरम्यानच कळणार असले, तरी फिरकीपटूंना मदत मिळणार हे नक्की.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/rohit-sharma-ms-dhoni-the-era-of-captains-who-won-10-ipl-titles-is-over-one-was-removed-and-one-surprised/
दरम्यान, आयपीएल इतिहासात CSK आणि RCB यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गतविजेत्या CSK ने 20 सामने जिंकले आहेत, तर RCB संघ फक्त 10 सामने जिंकू शकला आहे. दोन्ही संघांमधील 1 सामना अनिर्णित राहिला. अशाप्रकारे आरसीबीच्या तुलनेत CSKचा संघ वरचढ असल्याचे दिसते. मात्र, टी-20 क्रिकेटमध्ये एका चेंडूने खेळ बदलतो, त्यामुळे या फॉरमॅटमध्ये कोणता संघ सामना जिंकू शकतो हे सांगणे कठीण आहे.





