बेंगळुरू – एक्झिट पोलच्या निष्कर्षांत गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तेथे प्रो इन्कम्बन्सीची लाट आहे आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्येही असेच निकाल लागतील असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. कर्नाटकातही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनमत असून आम्ही शंभर टक्के राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करू असे त्यांनी म्हटले आहे.
बोम्मई म्हणाले की, लोक आज सुशासन आणि विकासकामांना पाठिंबा देतात. खोट्या आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोपांना पाठिंबा देत नाही हे अगदी स्पष्ट आहे. दोन्ही राज्यांमध्ये (गुजरात आणि हिमाचल प्रदेश) आमचा पक्ष विजयी होईल. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गुजरातमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनादेश येण्याची ही पहिलीच वेळ नाही, कारण तेथे भाजप सातव्यांदा विजयी होणार आहे. यावरून जनतेचा भाजपच्या कारभारावर, त्यांच्या नेत्यांवर आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर दृढ विश्वास असल्याचे स्पष्ट होते,असे ते म्हणाले.
Uttar Pradesh : वादग्रस्त जागी हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न; हिंदू महासभेच्या नेत्याला अटक
कर्नाटकमध्ये पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत.कर्नाटकात भाजपने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी 224 सदस्यीय विधानसभेत किमान 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.