IPL 2025 : गुजरात टायटन्सने सरावाला जोमात केली सुरुवात! फक्त ‘या’ दोन खेळाडूंनी मारली दांडी

Gujarat Titans restart IPL 2025 practice : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव संपल्यानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी रविवारी सराव सुरू केला. सर्व संघ सदस्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव केला आहे. पण, जोस बटलर आणि जेराल्ड कोएत्झी मैदानावर दिसले नाहीत. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचा चालू हंगाम एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता पुन्हा १६ मे पासून सुरु होणार असल्याची चर्चा आहे.
गुजरात टायटन्सने सुरु केला सराव –
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरात टायटन्स संघ रविवारी संध्याकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचला. या विषयावर बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले, हो, आम्ही सराव सुरू केला आहे. खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि आम्ही खेळण्यास तयार आहोत. अहवालात पुढे म्हटले आहे की इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आले नाहीत. तो अधिकारी पुढे म्हणाला, आमची संपूर्ण टीम येथे थांबली होती. फक्त जोस आणि गेराल्ड आले नाहीत पण गरज पडल्यास ते परत येतील.
Table-toppers Gujarat Titans have kicked off their preparations for the remainder of IPL 2025.#IPL2025 #GujaratTitans #ShubmanGill #CricketTwitter pic.twitter.com/Y01Mc6yOsB
— InsideSport (@InsideSportIND) May 11, 2025
गुजरात सध्या गुणतालिकेत अव्वल –
चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत आणि चार प्लेऑफ स्थानांसाठी सात संघ स्पर्धा करत आहेत. आयपीएल २०२५ चा हंगाम पुढे ढकलला जाईपर्यंत गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते. गुजरात ११ सामन्यांत आठ विजय आणि तीन पराभवांसह १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर आरसीबी संघ असू. पंजाब तिसऱ्या आणि मुंबई चौथ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा – IPL 2025 : दिल्लीला मोठा धक्का! आता ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात येणार नाही
आयपीएल २०२५ चे १६ सामने शिल्ल्क –
आयपीएल २०२५ चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. या हंगामात आतापर्यंत एकूण ५८ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गुरुवारी रद्द झालेल्या पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामन्याचा समावेश आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात आता एकूण १६ सामने शिल्लक होते, ज्यात प्लेऑफच्या सामन्यांचा आणि फायनल सामन्याचा समावेश आहे. गट टप्प्यातील अंतिम सामना १८ मे रोजी होणार होता. प्लेऑफ टप्पा २० मे रोजी सुरू होणार होता आणि विजेतेपदाचा सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार होता.





