#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान
Updated On:

अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने टाकलेला चेंडू सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. या स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम लढतीत त्याने राजस्थानविरुद्ध तब्बल 157.3 किलोमीटर प्रतितास या वेगाने चेंडू टाकला.
सनरायझर्स हैदराबादचा नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने 157 किलोमीटर प्रतितास या वेगाने चेंडू टाकला होता. त्याची कामगिरी फर्ग्युसनने मागे टाकली. यंदाच्या स्पर्धेत एकूण पाच वेगवान चेंडू घोषित केले गेले, तर त्यात मलिकचे तीन, तर फर्ग्युसनचे दोन चेंडू असे सर्वात पाच वेगवान चेंडू ठरतील.





