मुंबई – राज्य सरकारने गुजरातमधील मतदानासाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील मतदारांसाठी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांसाठी हा आदेश काढण्यात आला आहे.
हे गुजरातच्या सीमेला लागून असलेले जिल्हे असून या ठिकाणचे अनेक नागरिक हे गुजरातच्या मतदार यातील मतदार आहेत. त्यांना गुजरातमध्ये जाऊन मतदान करणे सोपे व्हावे म्हणून हा आदेश काढण्यात आला आहे.
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. ज्यांचे गुजरातमध्ये मतदार यादीत नाव आहे अशा कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
#GujaratElection : प्रचारसभेत राहुल गांधींचा भाजपावर आरोप; म्हणाले “आदिवासींचे हक्क हिरावून…”
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा आदेश काढला आहे, असे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे.