Gujarat Accident : गुजरातमध्ये धनिकपुत्राचा माज! मद्यधुंद अवस्थेत अनेकांना चिरडलं; घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल….

Vadodara Accident | Gujarat : गुजरातमधील वडोदरा येथे गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी ‘रक्षित चौरसिया’ने एक नवीन दावा केला आहे. तो म्हणतो की तो मद्यधुंद नव्हता आणि गाडीचा वेग फक्त ५० किमी प्रति तास होता.
या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी अटक केल्यानंतर, आरोपीने स्पष्ट केले की अपघात त्याच्या नियंत्रणाबाहेर गेला कारण एअरबॅग अचानक उघडली आणि त्याची दृष्टी बंद झाली. असं तो म्हणाला.
रक्षित चौरसिया नशेत असल्याचे दिसते…
या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये रक्षित चौरसिया नशेत असल्याचे दिसून येते. अपघातानंतर, तो गाडीतून उतरताना आणि पुन्हा एकदा ओरडताना दिसला, तर आजूबाजूचे लोक जखमींना मदत करण्याचा प्रयत्न करत होते.
या व्हिडिओमध्ये गाडीचा वेग खूप जास्त असल्याचे दिसून येत आहे परंतु आरोपीने जास्त वेगाने गाडी चालवल्याचा नकार केला आहे. तो म्हणाला की मला फक्त एक स्कूटर आणि एक कार दिसली, रस्त्याच्या कडेला एकही पादचारी दिसला नाही.
होलिका दहनानंतर घरी जात होतो?
चौकशीदरम्यान, जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो घटनेच्या रात्री पार्टीतून परतला होता का, तेव्हा त्याने दावा केला की तो कोणत्याही पार्टीला गेला नव्हता तर होलिका दहनानंतर घरी परतत होता.
#WATCH | Vadodara, Gujarat: One woman has died, and four others are injured after an overspeeding four-wheeler rammed into a two-wheeler (14/03).
Accused Rakshit Ravish Chaurasia claims, ” We were going ahead of the scooty, we were turning right and there was a pothole on the… pic.twitter.com/7UMundtDXH
— ANI (@ANI) March 15, 2025
त्याने असेही म्हटले की त्याने दारू किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ घेतले नव्हते आणि अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे त्याला माहितही नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२:३० वाजता वडोदराच्या करेलीबाग परिसरात हा अपघात झाला.
तपासात असे दिसून आले की रक्षित चौरसियाची कार १२० किमी प्रतितास वेगाने धावत होती आणि त्याने दोन स्कूटरना धडक दिली आणि स्वारांना ओढून नेले.
मृत महिलेचे नाव हेमानी पटेल असे आहे. ती तिच्या अल्पवयीन मुलीसोबत होळीचे रंग खरेदी करण्यासाठी बाहेर गेली होती. या अपघातात तिच्या मुलीसह इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार मालक मीत चौहानलाही केली अटक :
20-yr old Rakshit Chaurasia rams his car into 4 people in Vadodara. Young mother Hemani Patel who’d gone to buy Holi colors with her daughter dies on the spot.
Rakshit comes out shouting he wanted “another round.” His friend Mit Chauhan runs away. “Progressive modernity.” pic.twitter.com/jQJSCWeeds
— Sankrant Sanu सानु संक्रान्त ਸੰਕ੍ਰਾਂਤ ਸਾਨੁ (@sankrant) March 14, 2025
रक्षितसह पोलिसांनी अपघाताच्या वेळी कारमध्ये उपस्थित असलेल्या कार मालक मीत चौहानलाही अटक केली आहे. मीत चौहान हा वडोदरा येथील एका खाजगी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.
तो मद्यधुंद असावा अशी भीती असल्याने पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणीही केली आहे, ज्याचा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की हे स्पष्टपणे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चे प्रकरण आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
या घटनेचा अपघातस्थळावरील एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यात मद्यधुंद अवस्थेतील रक्षित अपघातानंतर गाडीतून बाहेर पडतो आणि ‘आणखी एक राऊंड’, ‘आणखी एक राऊंड’ असे ओरडताना दिसतो. तर तेथील जवळचे लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.
घटनास्थळी जखमी लोक जमिनीवर पडलेले दिसतात. या व्हिडिओत कार भरधाव असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्या तरुणाने माध्यमांशी बोलताना, त्याने केलेल्या कृत्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तो भरधाव कार चालवत असल्याचेही नाकारले.





