ओलेक्सीचे सुवर्णपदक काढले

ल्युसेन : उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात (डोपिंग) दोषी आढळल्यामुळे वेटलिफ्टिंगमध्ये २०१२ लंडन आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या युक्रेनच्या ओलेक्सी टोरोख्तियचे पदक मागे घेण्यात आले आहे. ३३ वर्षीय वेटलिफ्टर ओलेक्सीने १०५ किलो वजनी गटामध्ये हे सुवर्णपदक जिंकले होते.
Ukrainian weightlifter Oleksiy Torokhtiy stripped of 2012 @Olympics gold for doping #WeightLifting pic.twitter.com/LKGsmzAxxJ
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 20, 2019
उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये तो दोषी आढळल्याचे समोर आले होते. त्याच्या यूरीन चाचणीत टेस्टोटरोन आढळले. त्याच्यावर दोन वर्षासाठी बंदीसुध्दा घालण्यात आली आहे.
तसेच, त्याचे पदक काढून रौप्यपदक विजेत्या इराणच्या नवाब नसिरशेलाल याला हे पदक देण्यात आले आहे.





