IPL 2025 : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट ! BCCI ने बदललं स्टेडियम; ‘या’ ठिकाणी पार पडणार अंतिम सामना

मुंबई : आयपीएल 2025 च्या फायनल तसंच क्वालिफायरच्या सामन्यांच्या ठिकाणांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यामध्ये सामन्यांची ठिकाणेदेखील बदलण्यात आली आहेत. मात्र बीसीसीआयने ऑफ आणि अंतिम फेरीची ठिकाणं काही जाहीर केली नव्हती. यापूर्वी अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार होता. मात्र आता हा सामना 3 जूनला होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने फायनलचे ठिकाणदेखील बदलले आहे.
‘या’ ठिकाणी पार पडणार अंतिम सामना
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या पर्वाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तर क्वॉलिफायर 2 स्पर्धेसाठीही या मैदानाची निवड केली गेली आहे. यासह मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये क्वॉलिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. यापूर्वी आयपीएलच्या महत्त्वपूर्ण सामन्यांचं यजमानपद भूषवलं आहे.
🚨 News 🚨
Schedule for TATA IPL 2025 Playoffs announced.
Additionally, Match no. 65 between #RCB and #SRH shifted to Lucknow from Bengaluru.
🔽 Details | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2025
2022 मध्ये याच मैदानात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. तर 2023 मध्ये पावसामुळे अंतिम सामना दोन दिवस चालला होता. तेव्हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डनऐवजी अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आतापर्यंत तीन संघांनी जागा मिळवली आहे. यात गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांचा समावेश आहे. चौथ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस आहे. या दोन पैकी एक संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवणार आहे. यंदा प्लेऑफमध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबीने जागा मिळवली आहे. हे दोन्ही संघ अजूनही जेतेपदापासून वंचित आहेत. त्यामुळे यावर्षी आयपीएलला नवा विजेता मिळणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





