GT vs RR : गुजरातने राजस्थानचा पराभव करत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान! सुदर्शन-कृष्णा चमकले

GT vs RR Gujarat Titans beat Rajasthan Royals by 58 runs in IPL 2025 : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. पाचपैकी चार सामने जिंकल्यानंतर, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. त्याच वेळी, राजस्थानला या हंगामात तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातच्या या शानदार विजयाचे शिल्पकार साई सुदर्शन आणि प्रसिद्ध कृष्णा ठरले.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने २० षटकांत सहा गडी गमावून २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १९.२ षटकांत १५९ धावांवर आटोपला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. दरम्यान, राशीद खान आणि साई किशोर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज, अर्शद खान आणि कुलवंत खेजरोलिया यांना प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
𝙎𝙖𝙞-𝙡𝙞𝙣𝙜 𝙎𝙢𝙤𝙤𝙩𝙝𝙡𝙮 ⛵
For his elegant and outstanding knock of 82(53), Sai Sudharsan wins the Player of the Match award 🏆
Scorecard ▶ https://t.co/raxxjzY9g7#TATAIPL | #GTvRR | @gujarat_titans pic.twitter.com/WwzOjUSTAl
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2025
गुजरातने गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान –
२१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. संघाला पहिला धक्का दुसऱ्या षटकात अर्शद खानने दिला. त्याने यशस्वी जैस्वालला फक्त सहा धावांवर झेलबाद केले. यानंतर, मोहम्मद सिराजने नितीश राणाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो फक्त एकच धाव करू शकला. यानंतर, रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये ४८ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, रियानने एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. खेजरोलियाच्या चेंडूवर बटलरने त्याला झेलबाद केले.
हेही वाचा – Virat Kohli : ‘बाजूला ये, तुला दाखवतो…’, IPL पदार्पणातच विराटने ‘या’ स्टार खेळाडूला दिली होती धमकी
हेही वाचा – GT vs RR : साई सुदर्शनचा मोठा धमाका! मोडला ख्रिस गेलचा खास विक्रम
गुजरातसाठी साई सुदर्शनने सर्वाधिक धावांचे योगदान दिले –
तत्पूर्वी या सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार शुबमन गिल फक्त दोन धावा करून बाद झाला. यानंतर सुदर्शनला जोस बटलरची साथ मिळाली. दोघांमध्ये ४७ चेंडूत ८० धावांची भागीदारी झाली. महेश तीक्षानाने बटलरला एलबीडब्ल्यू आऊट केले. पाच चौकारांच्या मदतीने ३६ धावा काढून तो बाद झाला. यानंतर सुदर्शनने शाहरुख खानसोबत ६२ धावा जोडल्या. तोही ३६ धावांची खेळी खेळून बाद झाला. गुजरातकडून शेरफेन रुदरफोर्डने सात आणि रशीद खानने १२ धावा केल्या. राहुल तेवतिया (१२) आणि अर्शद खान (०) नाबाद राहिले. गुजरातसाठी साई सुदर्शनने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५३ चेंडूत ८२ धावा कुटल्या.





