GT vs MI : हार्दिकच्या पलटनचा दमदार कमबॅक! तिलकच्या शतकानंतर गुजरातचं १०० धावांत ‘पॅक-अप’; मुंबईचा ९९ धावांनी विजय
GT vs MI : या सामन्यात मुंबईने गुजरातचा ९९ धावांनी धुव्वा उडवत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे.

GT vs MI Mumbai Indians 2nd Win Tilak Varma Century : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या ३० व्या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्स सलग चार पराभवानंतर विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे. या सामन्यात मुंबईने गुजरातचा ९९ धावांनी धुव्वा उडवत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे युवा फलंदाज तिलक वर्मा, ज्याने आपल्या वादळी शतकाने गुजरातच्या गोलंदाजांना निरुत्तर केले.
तिलक वर्माने झळकावले वादळी शतक –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या ४४ धावांत ३ गडी गमावल्यानंतर संघ संकटात होता. मात्र, तिथून तिलक वर्माने डावाची सूत्रे हाती घेतली आणि गुजरातच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. तिलकने अवघ्या ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली.
Maiden #TATAIPL Hundred 💯
Maiden Player of the Match award 🏅Tilak Varma with a field day out in Ahmedabad 😎
Relive his knock ▶️ https://t.co/mw5Bug2qQ0 #GTvMI | #KhelBindaas | @mipaltan | @TilakV9 pic.twitter.com/XAChWGwqGB
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
एकाच षटकात कुटल्या २६ धावा!
That winning feeling 🥳@mipaltan fans, how delighted are you? 😉
Scorecard ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI pic.twitter.com/7U2ABgTRsK
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
तिलक वर्माच्या फलंदाजीचा खरा थरार डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळाला. त्याने १६ ते २० व्या षटकांदरम्यान केवळ १८ चेंडूंत ६५ धावा कुटल्या. १८ व्या षटकात त्याने अशोक शर्माला लक्ष्य करत २६ धावा वसूल केल्या. त्याने आपल्या २२४ च्या स्ट्राईक रेटने केलेल्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. तिलकला नमन धीर (४५ धावा) याने मोलाची साथ दिली, ज्यामुळे मुंबईने १९९ धावांचा डोंगर उभा केला. गुजरातसाठी कगिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
अश्वनी कुमारने घेतल्या सर्वाधिक ४ विकेट्स –
Announcing his arrival in style, again!! 🔥
Ashwani Kumar with terrific figures of 4/24 🤩
WATCH HIS SPELL ▶️ https://t.co/T9FmpAKlrP#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @mipaltan pic.twitter.com/zk0YQNjvxr
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
२०० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना गुजरातचा कोणताही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. गुजरातचा संपूर्ण संघ १५.५ षटकांत १०० धावांत गारद झाला. मुंबईने हा सामना ९९ धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला. या सामन्यात मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने २४ धावा खर्च करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.





