MS Dhoni : ‘त्या दिवशी मला खरंच जाणवलं…’, निवृत्तीच्या प्रश्नावर गुगली टाकताना माहीने ‘ही’ गोष्ट केली मान्य

MS Dhoni react on age and retirement : एमएस धोनीची मैदानावरील चपळता आणि उत्साह सर्वांना थक्क करतो. पण आता तो स्वतःला वयस्कर समजू लागला आहे. गुजरातविरुद्धच्या विजयानंतर धोनीने ही गोष्ट कबूल केली. हर्षा भोगलेशी बोलताना धोनी म्हणाला की जेव्हा वैभव सूर्यवंशीसारखी मुलं पाया पडता, तेव्हा त्याला खरंच, त्याला वय झाल्यासारखं वाटतं. एवढंच नाही, त्याने चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी खेळाडू आंद्रे सिद्धार्थबरोबरचा एक मजेशीर किस्साही सांगितला.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सला ८३ धावांनी हरवले. सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी धोनीला विचारले, ‘जेव्हा वैभव सूर्यवंशीसारखे तरुण खेळाडू तुमच्या पाया पडतात, तेव्हा कसे वाटते?’ यावर धोनी म्हणाला,”खरंच वाटतं की मी म्हातारा झालोय.” राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर वैभव धोनीच्या पाया पडला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि लोकांनी वैभवचे खूप कौतुकही केले होते.
#CSK fans have a reason to cheer 💛🥳#MSDhoni #OneLastTime pic.twitter.com/uwhO8ZymTA
— Star Sports (@StarSportsIndia) May 25, 2025
धोनी टीम बसमधील सांगितला मजेशीर किस्सा –
धोनीने त्याच्या टीमच्या बसमधील मजेदार किस्सा सांगितला. तो म्हणाला, “आमच्या टीममध्ये आंद्रे सिद्धार्थ आहे. मी बसच्या मागच्या सीटवर बसतो आणि आंद्रे माझ्या शेजारच्या सीटवर. एकदा गप्पा मारताना मी त्याला विचारलं, ‘तुझं वय किती आहे?’ यानंतर त्याने त्याच वय सांगितल्यानंतर मला समजलं की तो माझ्यापेक्षा २५ वर्षांनी लहान आहे. त्या दिवशी मला खरंच जाणवलं की मी आता म्हातारा झालोय.” ४३ वर्षीय धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सांभाळतोय, पण तो पुढच्या हंगामात खेळणार की नाही हे अजून ठरलेलं नाही.
हेही वाचा – SRH vs KKR : हेनरिक क्लासेनने वादळी शतकाच्या जोरावर रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू
निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी काय म्हणाला?
I Not Saying i’m Coming Back or Not Coming Back @msdhoni 👑🥺🙏🏻! pic.twitter.com/FmPW4wqlJ4
— `🧃 (@Dhoniloki) May 25, 2025
निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी म्हणाला की, “माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी चार-पाच महिने आहेत, घाई करण्याची गरज नाही. शरीर तंदुरुस्त ठेवणं महत्त्वाचं आहे. आता रांचीला जाईन, तिथे थोडी बाइक राइडिंगचा आनंद घेईन. मी असं नाही म्हणत की मी निवृत्त होत आहे, किंवा पुनरागमन करत आहे. माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. विचार करेन आणि मग निर्णय घेईन.”





