भारतीय लष्कराला मोठे यश! चकमकीत लष्करचा टॉप कमांडर अबरारसह दोन दहशतवादी ठार

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसापासून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या कारवायांना सुरुवात केली आहे. त्यातच आज सकाळी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’च्या टॉप कमांडरला ठार करण्यात आले आहे. श्रीनगर जिल्ह्यातील परिंपोरा येथे चकमकीदरम्यान जवानांनी लष्करचा कमांडर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांला ठार केले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
घटनास्थळावरुन एके-४७ सहित मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नदीम अबरार याला सोमवारी अटक करण्यात आले होते. नदीम अबरार अनेक जवानांच्या तसेच नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच ठार करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवादी हा नदीम अबरारचा सहकारी होता असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
One terrorist neutralised in Maloora Parimpora, Srinagar; encounter continues: CRPF, PRO
— ANI (@ANI) June 28, 2021
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हायवेवर हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हायवेवर जम्मू काश्मीर पोलीस तसेच सीआरपीएफ जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
परिंपोरा नाका येथे पोलिसांनी एक वाहन थांबवून ओळख विचारली असता मागे बसलेल्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवानांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडले आणि त्याच्याकडील ग्रेनेड ताब्यात घेतले. यानंर चालक आणि त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी मास्क काढल्यानंतर ती व्यक्ती लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचे समोर आले.
Top LeT commander Abrar, who was arrested y'day, disclosed during interrogation that he had kept his AK-47 rifle in a house. When the party was entering the house to recover the weapon, one of his associate hiding inside the house fired on the party: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/rkWtzzIAyo
— ANI (@ANI) June 29, 2021
जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराकडून अबरारची संयुक्त चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मलूरा येथील एका घऱात एके-४७ लपवून ठेवले असल्याचे साांगितले. यानंतर ते शस्त्र जप्त करण्यासाठी अबरारला सोबत नेण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र यावेळी अबरारने तिथे आपला एक सहकारी लपून बसला असल्याची माहिती दिली नव्हती. अबरारला घेऊन सुरक्षा जवान पोहोचताच त्या दहशतवाद्याने गोळीबार सुरु केला. चकमकीदरम्यान सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले तर अबरारही गोळी लागल्याने जखमी झाला होता. यादरम्यान झालेल्या गोळीबारात घऱात लपून बसलेला दहशतवादी आणि अबरार दोघेही ठार झाले.




