आयडियाची कमाल! रिक्षा न चालवता मुंबईतील रिक्षाचालक कमवतोय लाखो रुपये

Viral News | रिक्षा चालवून महिन्याला ५ ते ८ लाख रुपये कमावणे, ही गोष्ट जरा अशक्यच वाटते ना… पण मुंबईच्या एका रिक्षाचालकाने हे करून दाखवले आहे. तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. मुंबईतील एक रिक्षाचालक दिवसाला जवळपास ३० हजार रुपये कमावतो. पण त्याचं कमावण्याचं माध्यम जरा वेगळं आहे. लिंक्डइनवर शेअर झालेल्या पोस्टनंतर हा रिक्षाचालक चर्चेत आला आहे.
ना कोणती मोठी पदवी, ना कोणती मोठी नोकरी, केवळ एक शक्कल लढवून हा रिक्षावाला मोठी कमाई करत आहे. लेन्सकार्टचे उत्पादन प्रमुख आणि अनुभवी उद्योजक राहुल रुपाणी यांनी यासंदर्भातील पोस्ट लिंक्डइनवर शेअर केली आहे. इतके पैसे कमवण्यासाठी तो त्याची रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला पार्क करतो आणि दररोज किमान २० हजारांची कमाई करतो.
दरम्यान, अमेरिकन वाणिज्य दूतावासात लॉकरची सुविधा किंवा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. संबंधित रिक्षाचालक व्हिसा ऑफिसच्या बाहेर उभा राहतो आणि आत जाणाऱ्या लोकांच्या बॅगा आपल्या रिक्षेमध्ये सांभाळून ठेवतो. यामध्ये व्हिसा ऑफिसमध्ये कामानिमित्त येणाऱ्या लोकांची महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू असतात. त्या बदल्यात तो त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतो. Viral News |
सुरक्षा नियमांनुसार वाणिज्य दूतावासाच्या आवारात बॅगा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. लोकांची हीच समस्या लक्षात घेऊन या रिक्षाचालकाने वाणिज्य दूतावासाबाहेर गाडी उभी केली आणि या कार्यालयात येणाऱ्यांच्या बॅगा सांभाळण्याचं काम सुरू केलं. अशा प्रकारे तो दिवसाला किमान २०-३० ग्राहक मिळवतो. त्यांच्याकडून दररोज त्याला २०-३० हजार रुपये सहज कमवता येतात. म्हणजेच महिन्याला तब्बल ५ ते ८ लाख रुपये कमावले जातात. Viral News |
हे काम करण्याकरता रिक्षाचालकाने पोलिसांचीही मदत घेतली आहे. पोलिसांच्या सुरक्षेच्या छायेत रिक्षाचालक लोकांच्या बॅगा किंवा इतर वस्तूंची देखभाल करतो. त्यामुळे तिथे येणाऱ्यांचा त्याच्यावर विश्वासही बसतो. ही पोस्ट करताना रुपानी यांनी या कल्पनेला मास्टरक्लास म्हटले आहे. Viral News |
हेही वाचा:
पंतप्रधान मोदींनी केले ‘सिंदूर’च्या रोपट्याचे वृक्षारोपन ; कच्छच्या महिलांनी दिली होती रोपट्याची भेट





