ग्रेट भेट ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटांची भेट

मुंबई ; राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “जी कामं अगदी शेवटी, घाईत मंजूर केली त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही,” असे सांगितले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकारी नाराज असल्याच्या बातम्यांना फेटाळून लावले. यावेळी बोलताना त्यांनी,”सरकार बदललं म्हणून कोणतीही लोकहिताची, अत्यावश्यक, विकासकामं रद्द होणार नाहीत असेही स्पष्ट केले आहे.





