आजोबांचा पायजमा ! सई ताम्हणकरच्या हटके लुकने वेधलं साऱ्यांचे लक्ष

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अभिनयासह सई तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. सई ताम्हणकरने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सई ताम्हणकरने आजोबांचा पायजमा परिधान करुन तिच्या फॅशनला ग्लॅमरसचा तडका लावला आहे. सईच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. सई ताम्हणकरने पायजमाला मॅचिंग असा सूट परिधान केला आहे.
View this post on Instagram
सईने या लूकमध्ये निळ्या रंगाचे ब्लेझर परिधान केले आणि त्यावर कॉर्सेट असा हटके लूक केला. मात्र अभिनेत्रीच्या या आउटफिटमधील पायजम्याने सर्वाधिक लक्ष वेधलं. सईने या पायजम्यावरुनच खास कॅप्शनही दिले. ‘आजोबांच्या पायजम्याचे मॉडर्न व्हर्जन परिधान करण्यासाठी खूपच उत्सुक होते’, असे कॅप्शन देत सई ताम्हणकरने हे फोटो शेअर केले आहेत. सध्या तिचा हा आगळावेगळा लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे.
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, अलीकडेच ती डब्बा कार्टल आणि क्राईम बिट या वेबसीरिजमध्ये झळकली. याशिवाय सई ताम्हणकर लवकरच समीर चौघुलेसोबत ‘गुलकंद’ या मराठी सिनेमात झळकणार आहे. सध्या सई महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सूत्रसंचानल करत आहेत. Sai Tamhankar |
हेही वाचा:
भास्कर जाधवांच्या नावाला भाजप-शिवसेनेचा विरोध? विरोधी पक्षनेता पदासाठी अडचण होण्याची शक्यता





