चंकी पांडे झाले आजोबा; अनन्याच्या चुलत बहीणीने दिला गोंडस बाळाला जन्म

Ananya Panday | बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अनन्या पांडेची चुलत बहीण आणि चंकी पांडेची पुतणी अलाना पांडेने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अलानाने व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अलाना पांडे ही मागील वर्षी मार्च महिन्यात आयवर मॅक्रेसोबत विवाहबद्ध झाली होती. त्यानंतर अलाना आणि इव्होर यांनी काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करून आई -बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली.
या जोडप्याने आता एका सुंदर मुलाचे स्वागत केले आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुलगा झाला असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये अलाना, इव्हर आणि नवजात बाळही दिसत आहे. व्हिडीओवर अलानाने कमेंट करत लिहिले की, ‘आमचा एंजल इथे आहे…’ या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Ananya Panday |
View this post on Instagram
दरम्यान, अलाना पांडे ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि फिटनेस इंस्ट्रक्टर डीन पांडे यांची मुलगी आहे. अलाना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहते. अलाना एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते. Ananya Panday |
दरम्यान, अनन्या पांडेने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिची बहीणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या जोडप्याचे अभिनंदन करत तिने ‘माझा सुंदर भाचा आला आहे’, असे कॅप्शनमध्ये लिहिले. सध्या घरात चिमुकल्या पाहुण्याच्या येण्याने अनन्या देखील आनंदी असल्याचे दिसत आहे. Ananya Panday |
हेही वाचा:
Pune : सोलापूरला जोडणारा सहा पदरी महामार्ग भैरोबा नाला ते यवत व्हावा – आमदार चेतन तुपे





