शिरूर : आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिरूर शहरासह पंचक्रोशित विविध समाजपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळीमळा येथे अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेश पाचर्णे यांनी शाळेला संगणक, प्रिंटर, स्कॅनर भेट दिला आहे. या अनोख्या भेटीने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता. यावेळी अशोक पवार यांनी लहान मुलांशी संवाद साधला. तसेच शिरूर शहरात रामलिंग महिला उन्नती बहु. सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला पक्ष यांच्या वतीने शिरूर येथे जुन्या नगर परिषदेच्या कार्यालयात वकृत्व व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी राणी बनकर यांनी आमदार अशोक पवार यांची सुंदर रांगोळी रेखाटली होती. यावेळी रविंद्र ढोबळे, सुरेश पाचर्णे, सागर नरवडे, आप्पा वर्पे, शरद पवार, रविंद्र खांडरे, शामकांत वर्पे ,अमोल चव्हाण, गोविंद कुंरदळे, मंगेश दंडवते,सर्व माजी सैनिक, साधना शितोळे, राणी कर्डिले, संगीता शेवाळे, गीता आढाव, आश्विनी जाधव, स्मिता कवाद, सविता बोरूडे, शशिकला काळे, प्रियांका धोत्रे, परीसरातील पुरुष – महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.