Gramin News : बनेश्वर मंदिरात श्री म्हातोबा देवाच्या पालखीचे भव्य स्वागत
नसरापूर : श्रावण महिन्यानिमित्त कुरंगवडी (ता. भोर) येथील श्री म्हातोबा देवाची पालखी रविवारी मोठ्या उत्साहात वाजंत्रींच्या गजरात बनेश्वर मंदिरात दाखल झाली. यावेळी ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होऊन पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.
पालखी मंदिरात दाखल होताच श्री म्हातोबा देवासह जोगेश्वरी, वरदायिनी, वाघजाई व मराईदेवींच्या मुखवट्यांना बनेश्वरच्या पवित्र कुंडात जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवलिंगासह मुखवट्यांचा अभिषेक करून ‘देवभेट’ घडवून आणली. श्रद्धाळू भाविकांनी जयघोषात दर्शन घेतले. या प्रसंगी कुरंगवडी ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला.
भाविकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सोहळ्यात रमेश शिळीमकर, लाला शिळीमकर, पोपट शिळीमकर, उदय शिळीमकर, उमेश शिळीमकर, नरेश शिळीमकर, नवनाथ कचरे, संपत कांटे, रामा शिळीमकर, सुभाष घोरे, नाना घोरे, नीलेश घोरे, संतोष शिळीमकर, अनिल ननावरे, संदीप शिळीमकर, प्रकाशनाना शिळीमकर, शंकर घोरे, ज्ञाना शिळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तर या सर्व आयोजनाची जबाबदारी बनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पार पाडण्यात आली. ट्रस्टचे सचिव अनिल गयावळ व काशिनाथ पालकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.





