Gramin News: ‘इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठान’च्या वतीने इंदापूरात मोफत ॲम्बुलन्स सेवेचा प्रारंभ; दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांची खास उपस्थिती

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीने, जनसंपर्क कार्यालय उद्घाटन तसेच रुग्णवाहिका लोकार्पण, व
रक्तदान शिबिराचे उद्घाटन, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा शाब्दिक गौरव केला. गोरगरीब माणसाची सेवा करण्याचा ध्यास, इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून, या प्रतिष्ठांचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ मंजुळे करीत आहेत. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यात आगामी काळात कमी पडणार नाही. अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सामाजिक जाणवेतून काम करणारे युवक खऱ्या अर्थाने, इंदापूर तालुका इतर भागातून काम करतात. रक्तदानाचे महत्त्व इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जाणले असल्यामुळे रक्तदान चळवळ उभी केली आहे. रक्तदान ही फार मोठी गरज आहे यामुळेच जीव वाचू शकतात, रक्तदानच श्रेष्ठ दान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याचा शाब्दिक गौरव माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
यावेळी प्रवीण माने, श्रीमंत ढोले, आबासाहेब देवकते, अतुल व्यवहारे, प्रकाश शिंदे, बाळासाहेब ढवळे, गजानन गवळी, पोपट शिंदे, अमर जगदाळे, राजेंद्र गोलांडे, चांगदेव ढूके, प्रशांत गलांडे, ज्योतीराम पेटकर, अर्जुन पेटकर, शत्रुघ्न शिंदे, विजय सिद, दत्तात्रय पांढरे, राहुल पाटील, शिवाजी भोई व राजकीय आणि सामाजिक सेवेतील सर्वच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात शेकडो इंदापूर येथिल युवकांनी रक्तदान केले. इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन शहरातील सामान्य नागरिकांच्या हस्ते केल्याने उपस्थित जनसमुदाय यांनी कौतुक केले. यावेळी प्रस्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ मंजुळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय व्यवहारे यांनी मानले.





