Gramin News : काठापूर गावचे माजी सरपंच ‘बिपीन थिटे’ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

शिरूर : काठापूर खुर्द (ता. शिरूर) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे (दि.२७) रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे यांच्यावर काठापूर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. थिटे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून तर सध्या त्यांच्या पत्नी सीमा थिटे या काठापूर खुर्द येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत.
थिटे यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या व पत्नीच्या पदाच्या माध्यमातून अनेक विकासकामे तसेच सर्वसामान्य जनतेची कामे करण्यामध्ये मोठे योगदान दिले होते. थिटे यांचे गावच्या जडणघडणीबरोबरच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान होते.
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,पोपटराव गावडे, प्रकाशबापू पवार, बाळासाहेब बेंडे, प्रदीप वळसे पाटील, देवदत्त निकम, मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र गावडे, दामू घोडे, बाळासाहेब भोर,बाबाजी निचित, संपत पानमंद, मनिषा गावडे, शुभांगी पडवळ यांच्या सह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, अधिकारी, शिक्षक, पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रसंगी शोकाकुल वातावरणात थिटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चाताप आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे.





