Gramin News : जेष्ठ महिलेला मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी; तीन जणांवर गुन्हा दाखल

निमोणे – शिरुरच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका ६० वर्षीय जेष्ठ महिलेला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हेमा गोरख गव्हाणे, ज्योती राजु पवार, राजु पवार सर्व रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बायडाबाई भानुदास पवार (वय ६०) रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर या दि १८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ११: ४५ च्या सुमारास मांडवगण फराटा गावात बाजार आणण्यासाठी हेमा गोरख गव्हाणे हिच्या दारासमोरुन रस्त्याने जात असताना त्यांना हेमा गव्हाणे व ज्योती राजु पवार यांनी तु दारातुन जाऊ नको.. असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तेव्हा फिर्यादी त्यांना मला शिवीगाळ करु नका.. असे बोलत असताना हेमा गव्हाणे हिने बाजुला पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीच्या उजव्या गालावर जोरात मारला त्यावेळी त्या खाली पडल्या असता त्यांना हेमा गोरख गव्हाणे, ज्योती राजु पवार आणि राजु पवार यांनी पुन्हा हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे बायडाबाई पवार यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे वरील तिघांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार शिंदे हे करत आहेत.





