Gramin News : दिव्यांग दिनानिमित्त तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्काराचे वितरण

शिरूर : दिव्यांग दिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार हा समाजात स्वतः दिव्यांग असून सुद्धा समाजाचे देणे लागतो या भावनेतून ते सामाजिक कार्य करत असतात.
सामाजिक कार्यात नेहमीच चांगला सहभाग असलेले पांडुरंग शंकर डोके यांना या वर्षीचा तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार हा शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार, पोलिस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले यांच्या हस्ते ट्रॉफी आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
समाजात अनेक दिव्यांग हे स्वतःचे काम स्वतः करून समाजासाठी ही कार्य करत असतात. यांना प्रेरणा मिळावी म्हणून ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
यावेळी मुज्जुफर कुरेशी, रवींद्र खांडरे, मंगेश खांडरे, शरद पवार, केशव शिंदे, सागर नरवडे, युवराज सोनार, योगेश पवार, गिता आढाव व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.





