Gramin News: आव्हाळवाडी फाटा येथे विरुद्ध दिशेने वाहने रोखण्यासाठी लावले बोलार्ड
Updated On:

वाघोली : आव्हाळवाडी फाटा येथे लोहगाव रोडवरून महामार्गावर येताना विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक रोखण्यासाठी आव्हाळवाडी फाटा ते लोहगाव रोड कडे जाणारे रोडवर बोलार्ड लावण्यात आले आहे.
लोहगाव रोडने आव्हाळवाडी फाटा क्रॉस करून जाण्यास नो एंट्री असली तरी अनेक वाहने विरुद्ध दिशेने वाहने चालवून महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असतात.
बोलार्ड मुळे काही प्रमाणात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर आळा बसणार असला तरी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





