राज्यपालांचं मुख्य सचिवांना पत्र, बंडानंतर काढलेल्या कोट्यवधींच्या जीआरची चौकशी होणार?

मुंबई : महाराष्ट्रात सत्तानाट्य चालू असताना आणखी एक दणका ठाकरे सरकारला बसला आहे. मागच्या काही दिवसात ठकरे सरकारने अनेक जीआर काढले. घाईघाईने काढले गेलेल्या या जीआर बाबत आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याविषयी पत्र लिहिले आहे. दिनांक २२ ते २४ जून या दरम्यान सरकारकडून मंजूर झालेल्या जी आर ची माहिती राज्यपाल कोश्यारी यांनी मागविली आहे. इतक्या कमी काळात हे जीआर कसे मंजूर करण्यात आले ? याविषयी सविस्तर अहवाल राज्यपालांनी मागविला आहे.
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि सरकारकडून बेछूटपणे घेतल्या जात असलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर @maha_governor यांनी हस्तक्षेप करावा -विधानपरिषद विरोधी पक्ष नेते @mipravindarekar यांचं राज्यपालांना पत्र. #MaharashtraCrisis @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/ujm1fFSUqw
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 24, 2022
प्रवीण दरेकरांचे राज्यपालांना पत्र
दरम्यान भाजपचे प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिनांक २४ जून रोजी एक पत्र पाठवले होते. या पत्रात राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून(२२-२४ जून) अंदाधुंद निर्णय घेणे जात आहेत. त्याचे जीआर जरी केले जात आहेत. त्यात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा असे प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले होते.
आत राज्यपालांनी मागच्या काही दिवसात ठाकरे सरकारने जारी केलेल्या जीआर संबंधी माहिती मागविली आहे. राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना या जीआरबाबत काय माहिती देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.





