महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती; जाणून घ्या त्यांच्याबाबत अधिक माहिती

Maharashtra New Governor | महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. याबातबत शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकामध्ये एकूण 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आले आहे. सी. पी. राधाकृष्णन आता रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. तर झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा परिचय –
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते आहेत. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी कार्य सुरु केले. ते कोईम्बतूरमधून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
2004 ते 2007 या काळात त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्र होती. या कालावधीत त्यांनी नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठीही त्यांनी आवाज उठवला होता. ते 2016 ते 2019 पर्यंत ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले. Maharashtra New Governor |
गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल
सी. पी. राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहेत. तर महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहेत. रमेश बैस यांची 18 फेब्रुवारी 2023 रोजी नियुक्ती झाली होती. त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवले. मात्र त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. Maharashtra New Governor |
राज्यातील नवनियुक्त राज्यपालांची संपूर्ण यादी
- सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र
- हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
- संतोषकुमार गंगवार – झारखंड
- रामेन डेका – छत्तीसगड
- सी. एच. विजयशंकर – मेघालय
- ओमप्रकाश माथूर – सिक्किम
- जिष्णू देव वर्मा – तेलंगणा
- गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड
- लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
- के. कैलाशनाथन – पुदुच्चेरी (उप राज्यपाल).
हेही वाचा:





