“मतदान न करणाऱ्यांवर सरकारने…”; अभिनेता परेश रावल यांनी व्यक्त केला संताप

Paresh Rawal Lok Sabha Election Voting| लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यतील अंतिम 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाले आहे. आज महाराष्ट्रात ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत आहेत.
यानिमित्त सकाळपासूनच अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर परेश रावल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे म्हणत संताप व्यक्त केला.
काय म्हणाले परेश रावल ? Paresh Rawal Lok Sabha Election Voting|
“अनेक लोक म्हणतात, सरकार हे काम नाही करत, ते काम नाही करत. जर तुम्ही आज मतदानाचा हक्क बजावला नाही तर योग्य लोकप्रतिनिधी न निवडण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात.”
पुढे ते म्हणाले, “आता तुमची वेळ आहे, ज्याने तुमच्या हितासाठी काम केले आहे, त्याला मत द्या. जे मतदार मतदान करणार नाहीत, त्यांना सरकारने शिक्षा द्यायला हवी. जसे की वाढीव कर किंवा कोणताही दंड. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. जे मतदान करत नाहीत त्यांना नंतर सरकारच्या त्रुटींबद्दल तक्रार करण्याचा अधिकार नाही. यासाठी प्रत्येक व्यक्तीने मतदान करावे.”
दरम्यान, अक्षय कुमार, जान्हवी कपूर, फरहान अख्तर, झोया अख्तर, शोभा खोटे, सुनील शेट्टी, धर्मेंद्र आणि राजकुमार रावने मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच या कलाकरांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. Paresh Rawal Lok Sabha Election Voting|
हेही वाचा:
शांतीगिरी महाराज पुन्हा अडचणीत? ; ईव्हीएम मशीनमध्ये देवाचा वास असल्याचे म्हणत घातला यंत्राला हार





