Gotabaya Rajapaksa : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष राजपक्षे यांना विदेश प्रवासास न्यालयाकडून बंदी
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांन विदेश प्रवास करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. राजपक्षे यांच्याबरोबर लष्करी कर्नल मोहम्मद अन्सार आणि माजी गुप्तचर अधिकारी प्रेमानंद उदलगामा या अन्य दोन लष्करी अधिकाऱ्यांनाही विदेश प्रवासास मनाई करण्यात आली आहे.

Gotabaya Rajapaksa : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांन विदेश प्रवास करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. राजपक्षे यांच्याबरोबर लष्करी कर्नल मोहम्मद अन्सार आणि माजी गुप्तचर अधिकारी प्रेमानंद उदलगामा या अन्य दोन लष्करी अधिकाऱ्यांनाही विदेश प्रवासास मनाई करण्यात आली आहे.
श्रीलंकेत २०१९ साली झालेल्या ईस्टर हल्ल्याचा तपास सुरू असल्याने ईस्टर हल्ल्याचा तपास करणाऱ्या क्रिमिनल इनव्हेस्टिगेशन डिपार्टमेंटने केलेल्या विनंतीवरून या सर्वांना विदेश प्रवासास मनाई (Gotabaya Rajapaksa) करण्यात आली आहे. याच प्रकरणी माजी गुप्तचर सेवा संचालक सुरेश सल्लाय यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी सुरू असल्याने हे आदेश दिले गेले आहेत.
दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी ईस्टरच्या दिवशी चर्चवर आत्मघातकी बॉम्बहल्ला आणि लक्झरी हॉटेलांमध्ये गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात २७० जण ठार झाले होते. या हल्ल्यात ११ भारतीय नागरिकही (Gotabaya Rajapaksa) मारले गेले होते. जर गोटाबाया राजपक्षे आणि दोन लष्करी अधिकारी देशाबाहेर पळून गेले, तर सुरू असलेल्या तपासात अडथळा येऊ शकतो, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते.






