नाशिकमध्ये भाजप आमदाराच्या विराट सभेत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फोटो

नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सभेत गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकले असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या सभेत पडळकर यांनी हिंदुत्व, धर्मांतर, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, हलाल अर्थव्यवस्था अशा मुद्द्यांवर आक्रमक भाष्य केले. त्यांनी राज्यातील मंदिरांमध्ये CCTV बसवण्याची आणि प्रत्येक गावात ‘धर्म दल’ स्थापण्याची मागणी केली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला. यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फूटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान गणेश लोणारे प्रस्तुत ‘शिव पर्वती विवाह सोहळा’(जिवंत देखावा)या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
नेमकं काय घडलं?
नाशिक मध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू विराट सभेचे आयोजन केले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने ही सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी गोपीचंद पडाळकर यांचे भाषण सुरु असताना काही तरुणांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो हातात धरुन ते झळकवले. लॉरेन्स बिश्नोई हा मोठा गँंगस्टर आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरु
या सभेत बोलताना पडळकर म्हणाले की, राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरु आहे. लव्ह जिहाद सुरु आहे, या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट का पाहता? लँड जिहाद किती झाले मोकळी जागा बघितली की बांधा मशीद. त्यांच्याकडे मिलिटरी आणि रेल्वे पेक्षा यांच्याकडे जास्त जागा आहे. हे वक्फ बोर्ड आले कुठून औरग्यांच्या काळात नव्हतं.
कायदा लागू करण्याची का वेळ आली? राम मंदिर बांधल्यापासून सरकाराला महसूल मिळाला. 130 मोक्याच्या जागा लोकसभा लागण्याअगोदर देऊन टाकल्या, इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या, ही सरकारची मालमत्ता दिली. विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई एक कुख्यात गँगस्टर आहे. 2014 पासून तो तुरुंगात आहे. त्याच्यावर खंडणी, खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे 84 हून अधिक खटले दाखल आहेत. त्याच्या टोळीमध्ये देशभरात 700 हून अधिक शूटर असल्याचा दावा केला जात आहे. एवढंच नाहीतर जी भारतासह कॅनडा, अमेरिका, युरोप आणि आखाती देशांमध्ये त्याची गँग सक्रीय आहे.





