Bjp leader : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हरियाणा विधानसभेचे माजी उपसभापती गोपीचंद गेहलोत यांचे शनिवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. (Bjp leader) गेल्या चार वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोपीचंद गेहलोत यांनी २००० साली गुरुग्राम मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इंडियन नॅशनल लोक दल (INLD) सरकारमध्ये विधानसभेचे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. (Bjp leader) ते चौटाला कुटुंबाच्या जवळचे मानले जात होते. २००५ आणि २०१४ मध्ये त्यांनी आयएनएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. २०१९ साली त्यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केला. त्यांच्या निधनाबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत गेहलोत यांच्या साधेपणाचा आणि लोककल्याणासाठीच्या योगदानाचा गौरव केला. गोपीचंद गेहलोत यांच्या निधनाने हरियाणाच्या राजकारणातील एक अनुभवी आणि मनमिळाऊ चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. (Bjp leader)