‘कोरोना वॉरियर्स’साठी गुगलचे खास डुडल

मुंबई : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान गुगलने आपल्या डुडलमार्फत ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणजेच कोरोनाला हरवण्यासाठी लढा देणाऱ्यांना थँक्यू म्हटले आहे. या व्यक्ती लॉकडाऊन असूनही सतत आपल्याला सेवा देत आहेत. गुगलने यासाठी डूडलची खास सीरीज तयार केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून ते कोरोना विरूद्ध लढा देणाऱ्या आणि लोकांच्या मदतीसाठी तप्तर असणाऱ्या लोकांचा सन्मान करत आहेत.
गुगलने आज पुन्हा एकदा खास डूडल तयार केले आहे. आतापर्यंत गुगलने प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांचा सन्मानार्थ डूडल तयार केले होते. आज गुगल या सर्वांना एकत्र डुडल तयार करून धन्यवाद म्हणत आहे.
आपल्या या खास स्पेशल डुडलमार्फत गुगलने फूड वर्कर्स, पॅकिंग अॅन्ड शिपिंग वर्कर्स, पब्लिक ट्रान्सपोर्टर्स, ग्रोसरी वर्कर्स, टिचर्स, सफाई कर्मचारी यांना धन्यवाद म्हणत आहे. गुगलने G हे अल्फाबेट वापरलं आहे. त्यानंतर लेटर्सऐवजी कॅरेक्टर्स वापरले असून पुन्हा GLE हे अल्फाबेट्स लिहिले आहेत.
दरम्यान, गुगलने कोरोना व्हायरसबाबत एक खास डुडल तयार केलं आहे. याआधी गुगलने शिक्षक, फऊड सर्विस देणारे कर्मचारी, लोकांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवणारे पॅकेजिंग, शिपिंग आणि डिलीवरी वर्कर्सना धन्यवाद दिलं होतं. याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानण्यासाठी वेगवेगळे डुडल तयार केले होते. त्याचबरोबर एका डुडलमार्फत जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टीप्सही दिल्या होत्या.




