लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; पटापट अकाऊंट चेक करा

Ladki Bahin Yojna | गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत होते. अखेर लाडक्या बहिणींना गुड न्यूज मिळाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तुमच्याही खात्यात 1500 रुपये जमा झाले असतील.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात आजपासून रक्कम जमा झाली आहे. सरकारने एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले असले तरी मे महिन्याच्या हप्त्याची अपडेट अद्याप आलेली नाही. दरम्यान, 30 एप्रिल रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मे महिना उजेडला तरी पैसे न जमा झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. Ladki Bahin Yojna |
या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून महिलांना दिलासा दिला होता. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यानुसार आजपासून महिलांच्या खात्यात रक्कम येण्यास सुरुवात झाली आहे. Ladki Bahin Yojna |
हेही वाचा:
Uddhav Thackeray : धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश





