Purandhar Airport : खुशखबर…! पुरंदर विमानतळाचा मार्ग सुकर ; ‘या’ वर्षी होणार एअरपोर्ट : मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणेः पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पुरंदर विमानतळाच्या उद्घाटनाचे वर्ष जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी २०२९ या वर्षांपर्यंत पुरंदर विमानतळ कार्यान्वित करण्याचे जाहीर केले आहे. मोहोळ यांनी X वरील पोस्टमध्ये याची घोषणा केली आहे. तसेच लोहेगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या विस्तारासाठी अडथळा मर्यादा (OLS) सर्वेक्षण पूर्ण झाले असून येत्या सहा महिन्यात भूसंपादन अंतिम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकर सुरू होईल, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि विमानतळ मार्च 2029 पर्यंत कार्यान्वित होईल, अशा विश्वास त्यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील विमानसेवा आणि विमानतळांच्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील ‘सह्याद्री’ अथितीगृहात आढावा बैठक संपन्न झाली. राज्यातील विमानतळांच्या विकासकामांना गती देणे आणि विमानसेवा वाढविण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), लष्कर, महाराष्ट्र विमानतळ महामंडळ आणि इतर विविध सरकारी संस्थांतील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
📍’सह्याद्री’, मुंबई | महाराष्ट्रातील विमानतळ आढावा बैठक
महाराष्ट्रातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकासकामांसदर्भात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत मुंबईतील ‘सह्याद्री’ येथे आढावा बैठक घेतली. विमानतळाच्या विकासकामांना आणखी वेग देण्यासंदर्भात आणि… pic.twitter.com/o3ae0Jp7xb
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 6, 2025





