एक ट्वीट अन् मुख्यमंत्र्यांनी थेट बस चालकाला केलं निलंबित; प्रवाशासोबत नेमकं काय घडलं? वाचा….

Chief Minister Devendra Fadnavis visits Pune | आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असून सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार वितरण समारंभ, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशन व प्रदर्शनी, गणेश कला क्रीडा मंच येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी पुणे-दादर शिवनेरी बसने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशाने बसचा चालक गाडी चालवताना सतत फोनवर बोलत असल्याचा एक फोटो सीएमओ या अॅाफिशियल एक्स हँन्डवर टॅग केला. यानंतर याची सीएमओने तात्काळ दखल घेतली असून संंबंधित चालकाचे निंलबन करण्यात आले आहे. फडणवीस यांच्या या तत्पर कारवाईबाबत त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
This driver was immediately suspended.
FIR is in process.
And more action is underway.@nitingodbole, your concern was duly noted and directed to respective Department officials, they verified it and did the due process for above immediate actions. https://t.co/hpFmProRUH— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 23, 2025
नेमकं काय घडलं?
आज सकाळी पुण्याहून पुणे ते दादर या शिवनेरी बसने नितीन गोडबोले नावाची व्यक्ती प्रवास करीत होती. या प्रवासादरम्यान बसचा चालक वाहन चालवताना सतत फोनवर बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी चालकाला फोनवरून बोलू नकोस, असे सांगितले. ही बस पुण्याहून दादरच्या दिशेने सकाळी निघाले होती. याविषीयी प्रवासी नितीन गोडबोल यांनी चालकाचा फोनवर बोलत बस चालवण्याचा फोटो काढून तो त्यांच्या एक्सवरून सीएमओ या अॅाफिशयन अॅकाउंटला टॅग केला. या पोस्टमध्ये त्यांनी तक्रार कोठे करायची असा प्रश्न उपस्थित केला.
त्यांच्या या तक्राराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधित चालकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.





