शुभमंगल सावधान…! आलिया भट्ट-रणबीर कपूर घेतले सात फेरे

मुंबई – अभिनेत्री ‘आलिया भट्ट’ आणि अभिनेता ‘रणबीर कपूर’ बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकले आहे.
View this post on Instagram
रणबीरच्या पाली हिल येथील वास्तू या घरातच हा लग्न सोहळा पार पडतो आहे. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नामुळे नीतू कपूर खूप खूश आहे. बुधवारी, 13 एप्रिल रोजी दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी नीतू कपूरने मल्टीकलर घागरा सेट परिधान केला होता.
View this post on Instagram
हा घागरा प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी बनवले आहेत. मुलाच्या मेहंदी सोहळ्यात नीतू कपूर खूपच सुंदर दिसत होत्या. रणबीर आणि आलियाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
View this post on Instagram
एकीकडे आनंदाचं वातावरण आणि दुसरीकडे रणबीरचे वडील ऋषी कपूर यांची उणीव यामुळे हा सोहळा खूपच भावनिक होत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीच्या लग्नाची चर्चा तशी गेल्या काही वर्षापासून सुरू आहेच.
View this post on Instagram
पण काही दिवसांपूर्वी आलियाच्या आजोबांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या इच्छेखातर या जोडीने लवकरात लवकर बोहल्यावर चढण्याचं ठरवलं. दरम्यान लग्नाला करण जोहर, शाहरुख खान, आदित्य रॉय कपूर, विक्की कौशल-कॅटरीना कैफ, रणवीर सिंह-दीपिका पदुकोण यांच्यासह बॉलिवूडमधले बडे सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.





