नवी दिल्ली – दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याच्या दरात 30 रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर 52,731 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 856 रुपयांनी वाढून 61,518 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,741 डॉलर व चांदीचा दर 21.05 डॉलर प्रति औंस झाला. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव वाढल्यानंतर भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढले.
#FIFAWorldCup2022 : सौदी अरेबियाचा अर्जेन्टिनावर सनसनाटी विजय
जागतिक परिस्थिती अस्थिर असल्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, जागतिक मंदी विविध देशात दरम्यान निर्माण झालेला तणाव आणि वाढत असलेले महागाई या कारणामुळे आगामी काळात कमी अधिक प्रमाणात सोने आणि चांदीचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता अधिक आहे.