Gold-Silver Rates : सोन्याचा भाव 1,49,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर; चांदी 2,13,400 रुपये प्रति किलो
Gold-Silver Rates : दिल्ली सराफा बाजारात 21 ऑक्टोबरला सोने 1,300 आणि चांदी 1,600 रुपयांनी घसरली. रुपया, क्रूड ऑइल आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोन्या-चांदीवर परिणाम जाणून घ्या.

Gold-Silver Rates : दिल्ली सराफा बाजारात बुधवारी (21 ऑक्टोबर) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा भाव 1,300 रुपयांनी कमी होऊन 1,49,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. चांदीचा दरही 1,600 रुपयांनी घसरून 2,13,400 रुपये प्रति किलो झाला.
एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक जितीन त्रिवेदी यांनी सांगितले की, रुपया मजबूत झाल्याने देशांतर्गत सोन्याच्या दरावर दबाव आला आहे. क्रूड ऑइलचे दरही उच्च पातळीवर असल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सोन्या-चांदीतील गुंतवणूक तेजी काहीशी कमजोर दिसत आहे.
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया 48 पैशांनी मजबूत होऊन 94.43 वर बंद झाला आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
इतरही घटकांचा यावर परिणाम आहे, अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इराणसोबत शांतता कराराची शक्यता निर्माण झाल्याने सुरुवातीला तेलाच्या दरात नरमाई आली होती. त्याचा फायदा सोन्या-चांदीला झाला. मात्र, इराणने अमेरिकेसोबत चर्चेची शक्यता कमी असल्याचे सांगितल्यानंतर ही तेजी टिकली नाही.
अस्वीकरण : सोने चांदीत गुंतवणूकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. दैनिक प्रभात गुंतवणूकीचा सल्ला देत नाही. शहर, डीलरनुसार भाव बदलू शकतात.





