नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झाल्यानंतर भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या दरात घट झाली असल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 21 रुपयांनी कमी होऊन 54,963 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 464 रुपयांनी कमी होऊन 69,117 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,899 व चांदीचा दर 20.65 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक वायदे बाजारामध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्यानंतर स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले.