Gold Rates Today : सोन्याच्या दरात माफक वाढ; जाणून घ्या लेटेस्ट दर
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार भारतीय बाजारात सोन्याच्या दरात माफक वाढ झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 128 रुपयांनी वाढून 46,353 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर सहा रुपयांनी वाढून 60,897 रुपये प्रतिकिलो झाला. डेल्टा व्हायरसचे रुग्ण वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत असल्याचे वातावरण आहे.





