Pune District : राष्ट्रीय पातळीवर आर्याला सुवर्ण पदक

कडूस : खेड तालुक्यातील कडूस येथील डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 5 वीमध्ये शिकणार्या आर्या माणिक होले या विद्यार्थिनीने, हरियाणा पंचकुला येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेमध्ये 22 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून शाळेचे, तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकविले आहे.
आर्याने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादित केले आहे. आर्याने मिळविलेल्या यशाबद्दल डायनॅमिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रताप गारगोटे, व्यवस्थापिका जयश्री गारगोटे, मुख्याध्यापक निखील ढमाले, क्रीडा शिक्षक यश मांजरे यांनी आर्याचे अभिनंदन केले. याप्रसंगी पंडित मोढवे, विलास गारगोटे, निलेश नेहेरे, दीपक को-हाळे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आर्याला तिचे वडील माणिक होले, राजू सर व अख्तर सर यांनी प्रशिक्षण दिले.





