Loan against gold: सोन्यावरील कर्ज दुप्पट; तरीही घाबरण्याचे कारण नाही – RBI
Loan against gold: गेल्या दोन वर्षात सोन्याच्या तारणावर दिले गेलेले कर्ज दुप्पटीन वाढलेले आहे. मात्र सोन्याचे मूल्य आणि कर्ज याचे प्रमाण रिझर्व बँकेने घालून दिलेल्या मर्यादित आहे. याबाबत चिंता करण्याची गरज नाही असे रिझर्व बँकेला वाटते.

Loan against gold: सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे सोन्यावर कर्ज घेणार्यांचे प्रमाण वाढले. मात्र या विषयावर चिंता करण्यासारखी कसलीही परिस्थिती नाही असे रिझर्व बँकेने म्हटले आहे.
रिझर्व बँकेकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, बँका आणि एनबीएफसीनी दिलेले कर्ज वाढत आहे याची जाणीव बँकेला आहे. मात्र सर्व बाबी मर्यादेत आहेत. या कर्ज वसुलीवर आतापर्यंत तरी कसलाही दबाव आलेला नाही. रिझर्व बँकेने सोनेतारण कर्जासंदर्भात वेळोवेळी आढावा घेतलेला आहे. यात आतापर्यंत तरी काही चिंताजनक आढळलेले नाही.
संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, एकूण परिस्थिती पाहता आम्हाला सध्या तरी या क्षेत्राबाबत नकारात्मक असे काहीही आढळून आलेले नाही. गेल्या दोन वर्षात सोन्याच्या तारणावर दिले गेलेले कर्ज दुप्पटीन वाढलेले आहे. मात्र सोन्याचे मूल्य आणि कर्ज याचे प्रमाण रिझर्व बँकेने घालून दिलेल्या मर्यादित आहे. याबाबत चिंता करण्याची गरज नाही असे रिझर्व बँकेला वाटते.





