नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावात वाढीचे सत्र सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. शनिवारी पुन्हा सोन्याच्या भावात 600 रुपये प्रति तोळ्याने वाढ होऊन ते 37 हजार 600 रुपयांवर पोहोचले. चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहोचली आहे.
अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढवल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत. शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली, तरी सोने 600 रुपये प्रति तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रति किलोने वाढली.