Gold -Silver prices Today: सोने 66,850 रुपये तोळा, चांदी 77,500 रुपये किलो; जूनमध्ये दर अजून वाढणार
Updated On:

Gold and silver prices Today – जागतिक बाजारात सध्या सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली सराफात सोन्याचा दर 100 रुपयांनी कमी होऊन 66,850 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 250 रुपयांनी कमी होऊन 77,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 2,173 डॉलर आणि चांदीचा डॉलर कमी होऊन 24.63 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. सध्या विविध देशातील आर्थिक परिस्थिती संदीग्ध असल्याची आकडेवारी समोर येत असल्यामुळे इतर बाजाराबरोबरच सोने आणि चांदीचा बाजार अस्थिर आहे. मात्र जूननंतर या दोन धातूचे दर वाढण्यास मदत होऊ शकेल. कारण त्यावेळी बर्याच देशातील व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





