Gokul Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; सतेज पाटलांना पहिला धक्का
Gokul Election : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील मानाचा तुरा मानल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Gokul Election : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्माण झालेला कायदेशीर पेच तूर्तास कायम असला, तरी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Gokul Election)
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळत १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. (Gokul Election)
या निवडणुकीत निवडून आलेल्या २५ संचालकांसह शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांनाही मतदान करता येणार आहे. मात्र, या चार सदस्यांनी दिलेली मते स्वतंत्रपणे ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (Gokul Election)
मतदानाची प्रक्रिया होणार व्हिडिओग्राफीसह
न्यायालयाच्या आदेशानुसार, उद्या ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदासाठी मतदान होईल. शासननियुक्त चार संचालकांची मते इतर मतांपासून वेगळी ठेवली जातील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. (Gokul Election)
अध्यादेशाच्या वैधतेचा निर्णय पुढील सुनावणीत
राज्य सरकारने जारी केलेला अध्यादेश योग्य आहे की नाही, याबाबत उच्च न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही. अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळण्यात आली असली, तरी त्याच्या वैधतेचा मुद्दा पुढील सुनावणीत तपासला जाणार आहे. (Gokul Election)
न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर करून अध्यक्षाची निवड केली जाईल. मात्र, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि तिचा अंतिम निकाल न्यायालयाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. (Gokul Election)





