मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय सराईत गुन्हेगार, जामिनावर आला होता बाहेर

Kalyan Hospital News | कल्यामधील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. मराठी तरुणीला परप्रांतीय गोकुळ झा याने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात तरुणीला गंभीर दुखपत झाली होती.
मारहाणीचा हा व्हिडीओ समोर येताच कल्याण पोलिसांची पाच पथकं परप्रांतीय तरुणाचा शोध घेत होती. अखेर मंगळवारी रात्री नवाळी परिसरात परप्रांतीय गोकुळ झा मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला. त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मराठी मुलीला मारणारा गोकुळ झा याच्यावर याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गोकुळवर कल्याण, कोळशेवाडी आणि उल्हासनगर परिसरात दरोडे तसेच मारहाणीचे अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत.
कल्याण पूर्वेतील नांदिवली भागात तो फेरीवाल्यांकडून जबरदस्तीने हप्ते गोळा करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गोपाळ झा हा नांदिवली परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो. त्यामुळे या भागात अनेकजण त्याला ओळखतात. मात्र, पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी गोकुळ झा याने त्याचा लूक बदलला होता. मात्र मंगळवारी रात्री मनसैनिकांनी त्याला कल्याणमधील वसार गावातून शेतात पळत जात असताना पकडलं. Kalyan Hospital News |
जामिनावर तुरुंगातून बाहेर
गोकुळ झा हा चार दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वी हत्यार बाळगणे आणि मारहाणीचा गुन्हे नोंदवले गेले आहे. विठ्ठलवाडी आणि कोळशेवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्याने हत्याराने मारहाण केली होती, तर दुसऱ्या प्रकरणात त्याने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, या प्रकरणात गोकुळला अटक झाली होती. चार दिवसांपूर्वीच गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता. आता तरुणीला मारहाण प्रकरणी गोकुळ झा याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. गोकुळ झाला कठोर शिक्षा होण्यासाठी त्याची सखोल चौकशी केली जात आहे.
हेही वाचा :
इशाक दार यांचे UNSC मध्ये काश्मीरवर मोठे विधान ; भारताने सडेतोड उत्तर देत,”आता सहन करणार नाही”





