ब्लॅक ड्रेसमध्ये ‘श्रुती मराठे’ दिसते खूप स्टनिंग

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘श्रृती मराठे’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर फॅन्ससह शेअर करते.
श्रृती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
नुकतंच श्रृतीने आपल्या इंस्टाग्रामवर ब्लॅक ड्रेस मधील काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय बोल्ड अँड ग्लॅमरस दिसत आहे.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच श्रृतीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.











