Anupam Kher : “मृत्यूनंतर कुटुंबात कोणताही वाद नको, म्हणून भाड्याच्या घरात राहतो”; अनुपम खेर नेमकं काय म्हणाले?

बॉलीवूडचे जेष्ठ आणि अनुभवी अभिनेते अनुपम खेर सहजपणे अनेक घरे विकत घेऊ शकतात. तरीही ते आजही भाड्याच्या घरात राहतात . नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण उघड केलं आहे .
अनुपम खेर सध्या त्यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत . देश विदेशात या चित्रपटच कौतुक झालं असलं तरी बॉक्स ऑफिसवर तो चालला नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनुपम खेर यांनीच केलं आहे.
‘द पॉवरफुल ह्युमॅन्स’ या पॉडकास्टमधे अनुपम खेर यांनी त्यांच्या कुटुंब आणि राहणीमानाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. ते म्हणाले कि,अजूनही ते भाड्याच्या घरात राहतात कारण, त्यांना त्यांच्या मृत्यनंतर कुटुंबात कोणताही वाद नको आहे.
जीवन जगायला फार काही लागत नाही:
आपण घर का घेतलं नाही यावर बोलताना खेर म्हणाले,”मी असं का करतो?कारण माझ्या जाण्यानंतर कुटुंबात संपत्तीवरून वाद होऊ नयेत , हे मला महत्वाचं वाटत. जेव्हा कोणी माणूस जातो तेव्हा तिची संपत्ती वाटताना वाद होण्याची शक्यता असते. पैशाच वाटप सोपं असत ,पण मालमत्तेवरून भांडण होतात. मी अनेक वडीलधाऱ्या लोकांना पाहिलं आहे, ज्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलं आहे., किंवा त्यांच्याकडून जबरजस्तीने घरावर सही करून घेतली. मला माझ्या घरात अश्या गोष्टी घडू द्यायच्या नाहीत.
मुलांना मिळाली पाहिजे स्वातंत्र्याची संधी:
अनुपम खेर यांची स्वतःची कोणतीही संतान नाही. त्यांचं एक सावत्र अपत्य आहे.सिकंदर खेर . ते म्हणाले सिकंदर माझा सावत्र मुलगा आहे. आजकालची मुले काहीही करण्याआधी आईवडिलांची परवानगी घेत नाहीत. मी सिकंदरकडे जाऊन कधीच सांगत नाही कि, त्याने त्याच काम कसे करावे.माझ्या वडिलांनीही मला कधीच काही सांगितलं नाही.आईवडिलांनी मुलांना थोडं स्वातंत्र्य द्यायला हवं,जेणेकरून ते त्यांच्या चुकांमधून शिकू शकतील”.





